बेंगळुरू- कर्नाटकातील बेंगळुरूमध्ये एका व्यक्तीने उड्डाणपुलावरून 10-10 च्या अनेक नोटा आज उडवल्या. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. गळ्यात घड्याळ घातलेली एक व्यक्ती या व्हिडीओमध्ये दिसत असून तो उड्डाणपुलावर उभे राहून १० च्या नोटा उडवत होता.नोटांचा पाऊस पडत असल्याचे पाहून या नोटा पकडण्यासाठी उड्डाणपुलाखाली लोकांची गर्दी झाली होती. एवढेच नाही तर उड्डाणपुलावर उभे राहून वाहने थांबवूनही लोक त्या व्यक्तीकडे जाऊन पैसे मागत होते. त्यामुळे रस्त्यावर वाहतुकीची कोंडी होऊन गोंधळ उडाला. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून आरोपीला ताब्यात घेतले. पोलिसांनी सांगितले की, 30 वर्षीय व्यक्तीने एकूण 3000 रुपये फेकले. त्यांची मानसिक स्थिती ठीक नसल्याचा पोलिसांना संशय आहे.