संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Monday, 27 March 2023

बॅंकेच्या लॉकरमध्ये ठेवलेल्या लाखोंच्या नोटांना चक्क वाळवी

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

उदयपूर- राजस्थानच्या उदयपूर येथील पंजाब नॅशनल बॅंकेच्या एका खातेदाराने बॅंकेच्या लॉकरमध्ये ठेवलेल्या लाखो रुपयांच्या नोटांना चक्क वाळवी लागल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी बँक व्यवस्थापन आपली जबाबदारी झटकून टाकत असल्याचा आरोप संबधित ग्राहकाने केला आहे.

या बॅंकेत सुनीता मेहता यांनी आपल्या नावाने लॉकर घेतले होते. या लॉकरमध्ये त्यांनी २.१५ लाख रुपये ठेवले होते. गेल्यावर्षी मे महिन्यात लॉकर उघडले तेव्हा पैसे सुरक्षित होते. मात्र, आता त्यांना गरज लागल्यानंतर त्यांनी लॉकर उघडले. त्यावेळी त्यांना नोटा वाळवीने खाल्ल्याचे दिसून आले. या घटनेनंतर बँक व्यवस्थापनाने बॅंकेत पेस्ट कंट्रोल केले नसल्याचा आरोप केला केला आहे
लॉकरमध्ये इतरही साहित्य आहे तेदेखील खराब झाल्याची शंका असल्याचे त्यांनी म्हटले आहे. त्यांनी या प्रकाराची तक्रार बॅंक मॅनेजरकडे केली आहे.

दरम्यान, बाकीच्या २०-२५ लॉकरमध्येदेखील वाळवी लागल्याची शंका व्यक्त केली जात आहे. बॅंकेच्या वरीष्ठ अधिकाऱ्यांना या घटनेची
माहिती कळवली असून ग्राहकांच्या समस्यांचे समाधान केले जाईल असे बॅंकेच्या व्यवस्थापकांनी म्हटले आहे.

आजचे हवामान
ताज्या बातम्या