संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Sunday, 04 December 2022

बुलेट ट्रेन जमीन प्रकरणी “गोदरेज” चे२६४ कोटी नुकसान भरपाईला आव्हान

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

मुंबई – मुंबई उपनगरातून जाणार्‍या बुलेट ट्रेनसाठी होणार्‍या जमीन अधिग्रहणाविरोधात गोदरेजने मुंबईत उच्च न्यायालयात नव्याने याचिका केली आहे.बुलेट ट्रेन प्रकल्पासाठी १० हेक्टर जमिनीसाठी २६४ कोटी रुपये नुकसानभरपाई देण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयाला गोदरेज ॲण्ड बॉयसी कंपनीने आव्हान देण्याची मुभा उच्च न्यायालयाकडे मागितली असून ती मान्य करत खंडपीठाने राज्य सरकार, नॅशनल हायस्पीड रेल्वे प्राधिकरण आणि अन्य प्रतिवादींना नोटीस जारी करत भूमिका मांडण्याचे निर्देश दिले आहेत.तसेच यावर आता १८ऑक्टोबरला सुनावणी निश्चित करण्यात आली आहे.

गोदरेजच्या मालकीच्या विक्रोळीतील जमिनीसाठी राज्य सरकराने मागील महिन्यात २६४ कोटी रुपयांची भरपाई निश्चित केली होती.विक्रोळीपासून ठाणेपर्यंत सुरू होणारा २१ किमीचा समुद्राखालचा हा बोगदा असून सरकारने मार्च २०१८ मध्ये विक्रोळी येथील ३९,५४७ चौरस किलोमीटर जमीन खासगी संपादित करण्यासाठी २०१३ सालच्या पुनर्वसन आणि पुनर्वसन कायद्याच्या नुकसानभरपाई अधिकारांतर्गत नोटीस काढण्यात आली होती. त्यानंतर उपजिल्हाधिकाऱ्यांनी भरपाईची रक्कम निश्चित केली. परंतु १५ जुलै २०२० रोजी झालेल्या सुनावणीनंतर २६ महिन्यांहून अधिक काळ लोटल्याने हे भूसंपादन रद्द झाल्याचा दावा कंपनीने याचिकेतून केला आहे.

न्या. नितीन जामदार आणि न्या.शर्मिला देशमुख यांच्या खंडपीठासमोर नुकतीच कंपनीच्या याचिकेवर सुनावणी झाली. २०१९ पासून प्रलंबित याचिकेमध्ये सुधारणा करण्याची आणि नुकसानभरपाईबाबतच्या सरकारच्या निर्णयाला आव्हान देण्याची मुभा खंडपीठाने गोदरेजला दिली आणि कंपनीच्या सुधारित याचिकेवर राज्य सरकारसह अन्य प्राधिकरणांनाही उत्तर दाखल करण्याचे निर्देश देत सुनावणी १८ ऑक्टोबर रोजी निश्चित केली आहे.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami