मंगळुरू येथील एका अभियांत्रिकी महाविद्यालयातील चार विद्यार्थ्यांनी बुरखा घालून बॉलिवूड गाण्यांवर डान्स करणे विद्यार्थ्यांना महागात पडले आहे. विद्यार्थ्यांचा डान्स व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर त्यांना निलंबित करण्यात आले. कर्नाटकातील मंगळुरू येथील सेंट जोसेफ इंजिनिअरींग कॉलेजमध्ये ही घटना घडली आहे.
या व्हिडीओमध्ये काही विद्यार्थी सलमान खानच्या दबंग चित्रपटातील ‘मेरी फोटो को सीने से यार.’ गाण्यावर डान्स करताना दिसत आहेत.हा व्हिडीओ जेव्हा सोशल मीडियावर व्हायरल झाला तेव्हा मात्र काही लोकांनी त्यावर तीव्र आक्षेप घेतला.बुधवारी रात्री उशिरा ही डान्स क्लिप सोशल मीडियावर फिरू लागल्याने अनेकांनी त्याला ‘बुरखा का मजाक’ म्हटले. व्हिडिओ विद्यार्थी संघटनेच्या एका अनौपचारिक कार्यक्रमातील असल्याचे सांगण्यात येत आहे.
सदर डान्स कार्यक्रमाचा भाग नव्हता शिवाय आमचे कॉलेज समाजातील एकोपा बिघडवणाऱ्या उपक्रमांना समर्थन देत नसल्याचे कॉलेजच्या प्राचार्यांनी स्पष्ट केले आहे. सोशल मीडियावर17 सेकंदांच्या डान्स क्लिपला अयोग्य आणि अश्लील’ म्हटल्यानंतर सेंट जोसेफ इंजिनीअरिंग कॉलेजने विद्यार्थ्यांवर त्वरीत कारवाई केली. प्राचार्य रिओ डिसोझा यांनी प्रसारमाध्यमांना सांगितले की, आम्ही चार विद्यार्थिनींना निलंबित केले आहे, जे मुस्लिम समुदायातील आहेत.