संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Thursday, 29 September 2022

बुडालेल्या डॉक्टरचा मृतदेह शोधताना जवानाचा जाळ्यात अडकून मृत्यू

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

माजलगाव – माजलगाव धरणात बुडून मृत्यू झालेल्या डॉक्टरचा मृतदेह शोधण्याचा प्रयत्न करणाऱ्या कोल्हापूर येथील आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या जवानाचा मच्छीमारांच्या जाळ्यात अडकून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना काल सोमवारी सकाळी घडली. राजशेखर प्रकाश मोरे (३०) असे मृताचे नाव आहे.माजलगाव तालुक्यातील बेलोरा येथील डॉ. दत्तात्रय श्रीमंत फपाळ (४५) हे काल सकाळी धरणात पोहण्यासाठी गेले होते. दम लागल्याने ते पाण्यात बुडाले. प्रशासनाने परळी, बीड येथील बचाव पथकांना पाचारण करून तातडीने त्यांचा शोध सुरू केला होता. मात्र सायंकाळी साडेसहापर्यंत डॉ. फपाळ यांचा शोध लागला नव्हता.

त्यामुळे कोल्हापूर येथील आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाला पाचारण करण्यात आले होते. त्यानुसार अकरा जवानांचे पथक दाखल झाले होते. डॉ. फपाळ यांचा मृतदेह शोधण्यासाठी पथकातील राजशेखर प्रकाश मोरे, शुभम काटकर हे ऑक्सिजन लावून धरणात उतरले. मच्छीमारांच्या जाळ्यात दोघेही अडकले.यात मोरे यांच्या पाठीवरील ऑक्सिजन सिलिंडर बाजूला गेला.दरम्यान,काटकर पाण्याबाहेर आले तेव्हा राजशेखर मोरे हे पाण्यातच असून त्यांची ऑक्सिजनची नळकांडी पाण्यावर तरंगताना दिसली.मच्छीमार महिलांसह परळी,बीड येथील बचाव पथकाने शर्थीचे प्रयत्न करून तीन तासानंतर मोरे यांना पाण्याबाहेर काढले. त्यांना ग्रामीण रूग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. जिल्हाधिकारी उतरले पाण्यातधरणात जवान बेपत्ता झाल्याचे कळताच जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा यांनी घटनास्थळी धाव घेतली.ते स्वतः अन्य जवानांच्या बोटीतून धरणातील पाण्यात उतरले.

कोल्हापूर येथील जवानाला डॉक्टरांनी मृत घोषित करताच त्यांच्या साथीदारांनी रुग्णालयात हंबरडा फोडला. त्यानंतर या धरणात बेपत्ता झालेल्या डॉ. दत्तात्रय फपाळ यांचा मृतदेह ३६ तासांच्या अथक प्रयत्नानंतर काल सायंकाळी पाचच्या सुमारास सापडला. मृतदेह शोधण्यासाठी आलेल्या कोल्हापूर येथील पथकातील एका जवानाचा मृत्यू झाल्याने अन्य सहकाऱ्यांनी बचाव कार्य काहीकाळ थांबवले होते. तोपर्यंत बीड, परळी येथील बचाव पथकांसह स्थानिक मच्छिमारांकडून शर्थीचे प्रयत्न सुरूच होते.राजशेखर मोरे या मृत जवानाच्या कुटुंबीयांस १० लाख रुपयांची आर्थिक मदत करावी, अशी मागणी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami