मुंबई -बीबीसीच्या मुंबई आणि नवी दिल्लीतील कार्यालयांवर आज दुसऱ्या दिवशीही आयकर विभागाने (आयटी) जोरदार छापेमारी (सर्वे) सुरु ठेवली. या छापेमारी दरम्यान बीसीसीने आपल्या कर्मचाऱ्यांना एक मेल पाठवून आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांना सहकार्यासह त्यांनी विचारलेल्या प्रश्नांचे योग्य उत्तर देण्याच्या सूचना केल्या.
बीबीसीच्या दिल्लीतील कार्यालयावर हिंदू सेनेचे कार्यकर्तेही आज धडकले आणि त्यांनी ‘बीबीसी भारत जोडो` च्या घोषणा दिल्या. तसेच या आयकर विभागाच्या छापेमारीविरोधात वेगवेगळ्या ठिकाणी संपादक आणि पत्रकारांचा निषेध व्यक्त केला. दरम्यान, गुजरात दंगलीच्या घटनेबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदींवर इंडिया-द मोदी क्वेश्चन हा दोन भागांचा माहितीपट बीबीसीने प्रसिद्ध केली. त्यानंतर आयकर विभागाने बीबीसी कार्यायलांवर छापेमारी सुरु केल्याचा आरोप केला जात आहे.