संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Wednesday, 30 November 2022

बीड हादरले! भाजपचे शहराध्यक्ष भगीरथ बियाणी यांची आत्महत्या

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

बीड- उद्धव ठाकरे गट आणि एकनाथ शिंदे गट यांच्यातील राजकीय घडामोडींमुळे महाराष्ट्राचे राजकारण सध्या कमालीचे तापले आहे. असे असताना बीडमध्ये खळबळ जनक घटना घडली. भाजपचे शहर अध्यक्ष भगीरथ बियाणी यांनी आपल्याच घरात आज दुपारी स्वतःवर गोळी झाडून घेऊन आत्महत्या केली. या घटनेमुळे संपूर्ण शहर हादरले आहे. बियाणी यांनी हे टोकाचे पाऊल का उचलले याची माहिती मिळालेली नाही. त्यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी सरकारी रुग्णालयात पाठवला आहे.

भाजपचे बीड शहर अध्यक्ष भगीरथ बियाणी यांनी आज दुपारी घरात स्वतःवर गोळी झाडून घेतली. गोळीबाराचा आवाज ऐकून तेथे एकच खळबळ माजली. घरातील लोकांनी खोलीत जाऊन पाहिले तेव्हा भगीरथ बियाणी रक्ताच्या थारोळ्यात पडले होते. त्यानंतर त्यांना तातडीने फिनिक्स रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु ते दाखल होण्यापूर्वी मरण पावले असल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. या घटनेची माहिती मिळताच खासदार प्रीतम मुंडे आणि भाजपच्या कार्यकर्त्यांनी रुग्णालयात धाव घेतली. बियाणी यांच्या आत्महत्येचे वृत्त झपाट्याने शहरात पसरले आणि शहरावर शोककळा पसरली. भाजपसाठीही हा मोठा हादरा आहे. बियाणी यांच्या आत्महत्येचे कारण अद्याप समजलेले नाही. पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी करून त्यांचा मृतदेह ताब्यात घेतला. तो शवविच्छेदनासाठी सरकारी रुग्णालयात पाठवला आहे. या प्रकरणाचा पोलिस अधिक तपास करत आहेत.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami