संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Thursday, 01 December 2022

बीड पाठोपाठ परभणीत शेतकर्‍याची आत्महत्या

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

बीड- हातातोंडाशी आलेले घास परतीच्या पावसाने हिरावून घेतल्याने बीडमध्येही शेती पिकांचे प्रचंड नुकसान झाल्याने शेतकर्‍याने आत्महत्या केल्याची घटना ताजी असताना घेतलेले कर्ज कसे फेडायचे या विचाराने परभणी जिल्ह्यातील एका तरुण शेतकर्‍याने आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना घडल्याचे समोर आले आहे.

सध्या राज्यात परतीच्या पावसाने धुमाकूळ घातला आहे. राज्यातील विविध जिल्ह्यात या परतीच्या पावसाचा मोठा फटका शेतकर्‍यांना बसला आहे. हाती आलेली पिकं या परतीच्या पावसाने वाया गेली आहेत. या परतीच्या पावसाने सोयाबीनचे झालेले नुकसान आणि खासगी फायनान्सचे घेतलेले कर्ज कसे फेडायचे या विवंचनेतून परभणी जिल्ह्यातील कौसडी येथील गुलाब जीवने (24) या शेतकर्‍याने आत्महत्या केली आहे. गुलाबकडे अडीच एकर शेती आहे. या शेतात त्यांनी सोयाबीन लावले होते. मात्र, परतीच्या पावसाने हे सोयाबीन वाया गेले. त्यातच खासगी फायनान्स कंपनीकडून घेतलेले कर्ज डोक्यावर असल्याने आपला प्रपंच चालवायचा कसा या विवंचनेत गुलाबने विषारी औषध प्राशन केले. या घटनेनंतर तत्काळ गावकर्‍यांनी त्याला बोरी येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र, त्या ठिकाणी गुलाबचा मृत्यू झाला.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami