संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Thursday, 01 December 2022

बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस गावांचा संपर्क तुटला! नद्यांना पूर

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

बीड – आठ-दहा दिवसांपासून विश्रांती घेतलेल्या पावसाने बीड जिल्ह्यात जोरदार हजेरी लावली. त्यात धारूर तालुक्यात विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस पडला. ढगफुटी सदृश्य पावसामुळे नदी नाल्यांना पूर आले. रूई धारूर- अंजनगाव रोडवरील पूल नदीच्या पाण्याखाली गेल्यामुळे गावांचा संपर्क तुटला आहे. या पावसाचा फटका अनेक गावांना बसला आहे.
बीड जिल्ह्यातील अनेक तालुक्यांमध्ये जोरदार पावसाने हजेरी लावली. त्यामुळे येथील नदी-नाल्यांना पूर आला आहे. धारूर तालुक्यातील आसरडोह, रुई धारूर, अंजनगाव तारांबळ उडाली.आणि अन्य गावांमध्ये जोरदार पाऊस पडला. त्याचा मोठा फटका गावांना बसला. नदी-नाल्यांना पूर आले. रुई धारूर ते अंजनगाव दरम्यानचा पूल पुराच्या पाण्याखाली गेल्याने येथील वाहतूक बंद पडली. परिणामी गावांचा संपर्क तुटला. 

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami