संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Wednesday, 05 October 2022

बीडीडी चाळीतील पोलिसांना नव्या घरांचा नंबर मिळाला

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

मुंबई- परळच्या ना. म. जोशीमार्ग येथील बीडीबी चाळीचा पुनर्विकास म्हाडातर्फे केला जात आहे. त्यात बांधण्यात येणाऱ्या नवीन इमारतींमध्ये १५४ पात्र पोलिस कर्मचाऱ्यांना मालकी तत्त्वावर घरे दिली जाणार आहेत. या इमारतींचा नंबर, मजला आणि त्यांच्या घराचा क्रमांक मंगळवारी २० सप्टेंबरला निश्चित केला. त्यानुसार त्यांना नवीन घरांचे नंबर मिळाले आहेत. बांधकाम पूर्ण झाल्यानंतर त्यांना ही नवीन घरे मिळणार आहेत.
बीडीडी चाळीतील १, २, ५, १२ आणि १३ या इमारती पोलिस विभागाच्या अखत्यारित आहेत. तेथे राहणाऱ्या १८२ पैकी १५४ पात्र गाळेधारकांच्या नावांची यादी पोलिस उपायुक्तांनी म्हाडाकडे पाठवली. त्यानुसार म्हाडाने पुनर्वसन इमारतीत या १५४ पात्र पोलिसांची घरे निश्चित केली आहेत. त्यात त्यांना इमारतीचा नंबर, मजला आणि घर नंबर दिला आहे. इमारतीचे बांधकाम पूर्ण झाल्यानंतर ही घरे पोलिसांना दिली जाणार आहेत. या घरांची क्रमांक निश्चिती मंगळवारी जाहीर केली. उच्च स्तरीय देखरेख समितीचे सदस्य जॉनी जोसेफ, राज्य सूचना व विज्ञान अधिकारी मोईज हुसैन अली, मुंबई विकास विभागाचे संचालक सतीश अंबावडे, उपमुख्य अधिकारी राजेंद्र गायकवाड आदींच्या उपस्थितीत ही घर नंबर निश्चिती झाली.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami