संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Saturday, 28 January 2023

बीडमध्ये चारशे फूट उंच डोंगरावर
गळफास घेत अज्ञाताची आत्महत्या

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

बीड : काही दिवसांपूर्वीच धारुर घाटात एका अज्ञात इसमाचा मृतदेह आढळून आल्याची घटना ताजी असतानाच धारुर तालुक्यात पुन्हा अज्ञात इसमाचा मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. चोरांबा येथील चारशे फूट उंच डोंगरावर अज्ञात इसमाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली. येथील पोलीस पाटील यांच्या माहितीनुसार, धारूर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. महिन्यातील ही तिसरी घटना असल्याने याबाबत चिंता व्यक्त केली जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, धारुर तालुक्यातील चोरांबा, थेटेगव्हाण जवळ असलेल्या चारशे फूट उंच डोंगरावर एका लिंबाच्या झाडाला अंदाजे ४० ते ४५ वय असलेल्या या इसमाचा मृतदेह झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला. गुरे चारणाऱ्या व्यक्तींना हा मृतदेह आढळून आल्याची माहिती समोर आली आहे. चोरंबा येथील पोलीस पाटील यांना सदर घटनेची माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी पोहोचून पाहणी केली. यानंतर धारूर पोलीस ठाण्यामध्ये सदर घटनेची माहिती देण्यात आली. सदर इसमाने आत्महत्या केल्याचा अंदाज सध्यातरी व्यक्त केला जात आहे. आत्महत्या करणाऱ्या व्यक्तीची ओळख अद्याप पटलेली नाही. ही व्यक्ती अज्ञात असून मागील पाच ते सहा दिवसांपूर्वी ही घटना घडलेली असल्याने पूर्णपणे सडलेल्या अवस्थेत मृतदेह सापडला आहे. कापडी रुमालाच्या सहाय्याने लिंबाच्या फांदीला गळफास घेतल्याचे घटनास्थळी दिसून आले. भोगलवाडी येथील आरोग्य अधिकाऱ्यांकडून घटनास्थळाची तपासणी करून मृतदेहाचा चोरंबा येथील गायरानामध्ये अंत्यविधी करण्यात आल्याची माहित आहे.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Close Bitnami banner
Bitnami