बीड – जिल्ह्यात ग्रामपंचायतीचा धुरळा उडाल्याचा पाहायला मिळत आहे.जिल्ह्यात होऊ घातलेल्या ७०४ ग्रामपंचायतच्या निवडणुकीपैकी ३७ ग्रामपंचायतीचे सरपंच बिनविरोध निवडून आले आहेत.बुधवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस होता.त्यानंतर हे चित्र स्पष्ट झाले आहे.
जिल्ह्यातील ७०४ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी १८ डिसेंबरला मतदान आहे. यावेळी सरपंच निवड थेट जनतेतून आहे. त्यामुळे चुरस तर वाढलीच आहे. शिवाय इच्छुकांच्या संख्येतही भर पडली. २८ नोव्हेंबर ते २ डिसेंबर या दरम्यान सदस्य पदांसाठी १९ हजार ७८४ तर सरपंचपदासाठी ४ हजार २५५ उमेदवारी अर्ज दाखल झाले होते.६ डिसेंबरला छाननी प्रक्रिया पार पडली. सरपंच व सदस्यपदाचे २२० अर्ज बाद झाले असून एकूण २३ हजार ४६८ अर्ज वैध ठरले आहे.तर उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा काल ७ डिसेंबर हा शेवटचा दिवस होता.यामध्ये ३७ ठिकाणच्या ग्रामपंचायतचे सरपंच बिनविरोध निवडून आले आहेत