संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Thursday, 01 December 2022

बिल्कीस बानो प्रकरणाच्या निषेधार्थ बीडमध्ये मुस्लिम महिलांचा मूक मोर्चा

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

बीड : अल्पसंख्याकांवरील वाढते हल्ले आणि बिल्कीस बानो प्रकरणी आरोपीची शिक्षा माफ केल्याच्या निषेधार्थ बीड शहरात आज मुस्लिम महिलांचा मूक मोर्चा काढण्यात आला. संविधान बचाव संघर्ष समितीच्या वतीने सकाळी साडेअकरा वाजता शहरातील मिल्लीया महाविद्यालय परिसरातून मोर्चाला सुरुवात झाली. हजारोंच्या संख्येने महिला रस्त्यावर उतरल्या.

बीड जिल्ह्यात संविधान बचाव संघर्ष समितीने विविध मागण्यांसंदर्भात १५ सप्टेंबर रोजी मोर्चाची हाक दिली होती. त्यानुसार,संविधान बचावच्या मागणीसाठी शहरासह जिल्हाभरात तालुक्याच्या ठिकाणी देखील मोर्चे काढण्यात आले. मोर्चाच्या अनुषंगाने मुस्लिम महिला किल्ला मैदान येथे मोठ्या संख्येने जमा झाल्या होत्या. बीड शहरामध्ये ठीक ठिकाणी काळे झेंडे लावून प्रकरणाचा निषेध व्यक्त करण्यात आला. याचाच एक भाग म्हणून महिला रस्त्यावर उतरल्या होत्या. या अनुषंगाने निषेध मोर्चामध्ये कुठलाही अनुचित प्रकार होऊ नये म्हणून बीड जिल्हा पोलीस प्रशासनाने तगडा बंदोबस्त ठेवला होता. बीड शहरातील किल्ला मैदान कारंजा रोड छत्रपती शिवाजी महाराज चौक मार्गे हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. या मोर्चामध्ये प्रामुख्याने बिल्कीस बानो प्रकरणातील आरोपींना कठोर शिक्षा व्हावी, मुस्लिम धर्मगुरूंबाबत वारंवार केल्या जाणाऱ्या वक्तव्याचा निषेध देखील यावेळी करण्यात आला.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami