संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Wednesday, 05 October 2022

बिटकॉइन घसरणीच्या मार्गावर! सर्वात नीचांकी पातळीवर पोहोचला

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

मुंबई- बिटकॉइन आणि इतर क्रिप्टो शेअर्सच्या दरांमध्ये ऐतिहासिक अशी घसरण झाल्यानंतर बिटकॉइन आतापर्यंतच्या सर्वात नीचांकी पातळीवर पोहोचला आहे. गेल्या आठवड्यात बिटकॉइनची किंमत जवळपास ६ लाखांनी घसरली होती. बिटकॉइन या महिन्यातही पुन्हा एकदा घसरणीच्या मार्गावर आहे. गुंतवणूकदारांचा प्रतिसाद कमी असल्याने दर सातत्याने उतरत आहेत. त्यामुळे गुंतवणूकदारांना एकाच दिवसात अब्जावधींचा फटका बसला आहे.आज भारतीय बाजारात एका बिटकॉइनची किंमत १६ लाख ०९ हजार २३७ रुपये इतकी होती

आज बिटकॉइनचा दर आंतरराष्ट्रीय बाजारात २० हजार ६०० डॉलर इतका होता.तर हाच दर भारतीय बाजारात १६ लाख ०९ हजार २३७ रुपये इतका होता.आज इथेरिअम कॉइनचा दर आंतरराष्ट्रीय बाजारात १ हजार १२६ डॉलर इतका होता.तर हाच दर भारतीय बाजारात १ लाख ३९ हजार ७३१ रुपये इतका होता. डोज कॉइनचा दर आंतरराष्ट्रीय बाजारात ०.०६० डॉलर इतका होता. तर हाच दर भारतीय बाजारात ४.३७ रुपये इतका होता.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami