संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Sunday, 25 September 2022

बिघडलेल्या वातावरणामुळे चिपळुणात माशांचे दर वाढले

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

रत्नागिरी : गेल्या काही दिवसांपासून, कोकण किनारपट्टीवर पावसामुळे बिघडलेले वातावरण अजूनही सुरळीत झालेले नाही. त्यामुळे समुद्रातील मच्छिमारीवर वारंवार व्यत्यय त्येत आहे. त्याचा परिणाम मासळी विक्रीवर झाला आहे. चिपळुणातील मासळीचे दर गगनाला भिडले आहेत. चिपळूण शहरात बांगडा २०० रुपये किलो आहे. सुरमई ७०० रुपये किलो, सरंगा ४५० रु. किलो, पापलेट ७०० रुपये किलो, टायनी कोळंबी १५० रुपये किलो,तर कोळंबी २५० रुपये किलो दराने विकली जात आहे.

मासळीच्या वाढलेल्या दराबाबत येथील विक्रेते सर्फराज बेबल यांनी याविषयी अधिक माहिती देताना सांगितले की, यावर्षी मासेमारी सुरु झाली परंतु हंगामावर पावसाचे सावट आहे. त्यामुळे मच्छिमार समुद्रात जात नाहीत. याचा परिणाम मासे कमी प्रमाणात येत आहेत. आणि त्यातही चांगले आणि ताजे मासे नागरिकांना देण्यासाठी होणारा वाहतूक खर्च, बर्फ, आणि इतर खर्चही वाढतो. त्यामुळे मासे जास्त दरात विकावे लागत असल्याचेच त्यांनी सांगितले.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami