संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Friday, 30 September 2022

बाळासाहेबांचे हिंदुत्व घेऊन आम्ही पुढे जाणार – एकनाथ शिंदे

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

मुंबई – गेल्या अनेक दिवसांपासून राज्यात जे राजकीय वादळ उठलंय त्यातून सर्वसामान्य जनतेला धक्क्यांवर धक्के मिळत आहेत. उद्धव ठाकरे यांनी काल मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर सर्वसामान्यांना प्रचंड वेग आला. आज सकाळीच एकनाथ शिंदे गोव्याहून मुंबईत दाखल झाले आणि त्यानंतर माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. मग देवेंद्र फडणवीसांनी थेट पत्रकार परिषद घेऊन एकनाथ शिंदे हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतील, अशी घोषणा केली आहे आणि सर्वांच्याच भुवया उंचावल्या. याबाबत बोलताना एकनाथ शिंदे यांनी ‘बाळासाहेबांचे हिंदुत्व घेऊन आम्ही पुढे जाणार’, असे म्हटले.

एकनाथ शिंदे म्हणाले, ‘आमदारांच्या मतदारसंघातील विकासकामे आणि राज्याचा विकास हा अजेंडा घेऊन आम्ही पुढे जाणार आहोत. शिवसेना पक्ष म्हणून कायदेशीर प्रक्रिया करून शिवसेनेचे तसेच अपक्ष आमदार मिळून आम्ही गेले काही दिवस एकत्र आहोत. अडीच वर्षापूर्वी घडलं ते आपल्याला माहिती आहे, गेल्या काही काळामध्ये मुख्यमंत्र्यांना मतदारसंघातील समस्या विकास प्रकल्प याबाबत वारंवार माहिती दिली, दुरूस्तीची मागणी केली, अनेक वेळा चर्चा केली पण मविआबाबत आमदारांमध्ये नाराजी होती, मतदार संघातील प्रश्न पाहता पुढच्या निवडणूक लढताना येणार्‍या अडचणी लक्षात घेत हा निर्णय घेतल्याचे त्यांनी सांगितले. आपण विरोधकांकडून सत्तेत जात असतो पण मागील घटनाक्रम बघितला तर सत्तेतून विरोधकांकडे जाण्याचा प्रकार घडला. मंत्रिमंडळात मंत्री म्हणून काम करत होतो पण महाविकास आघाडीमध्ये निर्णय घेता येत नव्हते, बाळासाहेंबांचं हिंदुत्व घेऊन पुढे जात असताना घेतलेल्या काही निर्णयाचं स्वागत आहे, पण हे पूर्वीच आपण करायला हवं. ५० आमदार जेव्हा वेगळी भूमिका घेतात याचा अर्थ याचं करणं याचं आत्मपरिक्षण करण्याची गरज होती. ५० लोक एकत्र आले, मला असलेल्या अडचणी सोडा पण या ५० जणांना मतदारसंघात येत असलेल्या अडचणी पहाता हा निर्णय घ्यावा लागला.

महत्त्वाचे म्हणजे फडणवीसांचे आभार मानत, एवढ्या मोठ्या मनाचा माणूस मिळणार नाही, ते मंत्रीमंडळात नसले तरी ते राज्याच्या विकासासाठी ते आमच्या सोबत आहेत असेही शिंदे यावेळी म्हणाले. ‘आमदारांचं संख्याबळ पाहता देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्रीपद त्यांच्याकडे ठेवू शकले असते पण त्यांनी मनाचा मोठेपणा दाखवला. बाळासाहेबांच्या शिवसैनिकाला पाठिंबा दिला याबद्दल देवेंद्र फडणवीस, पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह यांचे आभार मानतो’, असे ते म्हणाले. ‘ही एक ऐतिहासिक घटना आहे. कुणाला काही मंत्रीपद, मुख्यमंत्रीपद पाहिजे असं काही नव्हतं. जे घडलं ते वास्तव तुमच्यासमोर होतं, राज्याला विकासाच्या दिशेने नेण्याचे काम आपण करू’, असेही शिंदेंनी सांगितले.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami