संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Thursday, 01 December 2022

बाळासाहेबांचे विश्वासू चंपासिंह थापा शिंदे गटात

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

मुंबई- शिवसेनेचे ज्येष्ठ नेते एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी केल्यानंतर शिवसेना पक्षाला गळती लागली असताना आज दुपारी बाळासाहेब ठाकरेंचे विश्वासू चंपासिंह थापा यांनी एकनाथ शिंदे यांच्या उपस्थित शिंदे गटात प्रवेश केला. त्यांच्या प्रवेशामुळे ठाकरे कुटुंबासाठी हा सर्वात मोठा धक्का मानला जात आहे.

चंपासिंह थापा हा बाळासाहेबांच्या जवळील अतिशय विश्वासू व्यक्ती मानली जात होती. बाळासाहेबांच्या जेवणाच्या, औषधाच्या वेळा त्यांनी सांभाळल्या होत्या. थापा घरात, समारंभात, दौऱ्यावेळी बाळासाहेबांसोबत कायम होते. थापांनी जानेवारी महिन्यात मी बाळासाहेबांनंतर देखील मातोश्रीचा सेवक असल्याचे ठामपणे सांगितले होते. आता आठ महिन्यानंतर अचानक थापा हे शिंदे गटात सामिल होणे हे राजकीयदृष्ट्या धक्कादायक नसले तरी ठाकरे कुटुंबासाठी धक्का मानला जात आहे. प्रवेश केल्यानंतर थापा म्हणाले की, बाळासाहेबांचे विचार शिंदे घेऊन चालले आहेत म्हणून मी शिंदे गटात आलो, अन्यथा मी आलोही नसतो. मी माझ्या मनाने आलो. पण माझी आणि उद्धव ठाकरेंची भेट मधल्या काळात झाल्या असून बंगल्यावरही जाऊन आलो होतो. बाळासाहेबांची सावली होतो आहे आणि नेहमीच राहील.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami