संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Sunday, 25 September 2022

बाळासाहेबांचा फोटो पोस्ट करून राऊतांनी म्हटले, ‘विठ्ठल…विठ्ठल’

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

मुंबई – आज आषाढी एकादशीनिमित्त अनेकांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून एकमेकांना शुभेच्छा दिल्या. त्यात शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या ट्वीटर पोस्टची प्रचंड चर्चा झाली. त्यांनी हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा विठ्ठलासोबत फोटो पोस्ट करून ‘विठ्ठल…विठ्ठल…विठ्ठल…विठ्ठल…विठ्ठल… विठ्ठल..’ असे लिहिले आहे. या फोटोमध्ये बाळासाहेब ठाकरे कंबरेवर हात ठेवून उभे आहेत. हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून शिवसेना आणि शिंदे गटात संघर्ष सुरू असतानाच आज संजय राऊतांची ही पोस्ट चर्चेत आली.

संजय राऊत हे शिवसेनेतल्या बंडखोर आमदारांवर सातत्याने टीका करणे, शिवसैनिकांना संघटित करण्याचे प्रयत्न करणे यात आघाडीवर आहेत. बाळासाहेब ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्याप्रती आपली निष्ठा असल्याचा पुनरुच्चार ते सातत्याने करत आहेत. आमचा विठ्ठल एकच तो म्हणजे बाळासाहेब ठाकरे, असेही ते अनेकदा सांगतात. त्या पार्श्वभूमीवर त्यांचे हे ट्वीट चर्चेचा विषय ठरला आहे.

दरम्यान, राऊतांनी आज आणखी एक व्हिडिओ ट्विट केला. त्यात एक अस्वल दिसत आहे. या अस्वलासमोर आरसा येताच तो स्वत:लाच पाहून गांगरलेला दिसतो. हाच धागा पकडत संजय राऊतांनी राज्यातील सध्याच्या राजकीय परिस्थितीच्या अनुषंगाने बंडखोर आमदारांना टोला लगावला. ‘जेव्हा स्वतःला आरशात पाहताना भीती आणि लाज वाटते’, अशी खोचक टिप्पणी त्यांनी या ट्विटच्या कॅप्शनमध्ये केली आहे. यावर आता शिंदे गटातील आमदार प्रत्युत्तर देणार का, हे पाहावे लागेल.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami