संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Saturday, 28 January 2023

बारामती-लोणंद रेल्वे मार्गासाठी
४० हेक्टरचे सक्तीचे भूसंपादन

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

पुणे : गेल्या काही वर्षांपासून रखडलेल्या बारामती-फलटण-लोणंद रेल्वेमार्गाचे काम रखडले होते. या मार्गासाठी लागणाऱ्रे क्षेत्र संपादन करण्यासाठी काही नागरिकांकडून विरोध होत होता. मात्र आता हे काम मार्गी लागणार आहे. त्यासाठी आता बारामती-फलटण-लोणंद नवीन एकेरी रेल्वे मार्गासाठी आवश्यक १७६ हेक्टर जमिनीपैकी संपादन न झालेल्या ४० हेक्टर जमिनीचे सक्तीने संपादन करण्याचा प्रस्ताव रेल्वे प्रशासनाकडे दिल्याची माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली आहे.
या मार्गासाठी आतापर्यंत १३१ हेक्टर जमिनीचे संपादन पूर्ण झाले आहे. पुणे आणि सातारा या जिल्ह्यांना जोडणारा रेल्वे प्रकल्प म्हणून बारामती-फलटण-लोणंद या ६३.६५ किमी लांबीच्या रेल्वे प्रकल्पासाठी फलटण, बारामती या तालुक्यांतून भूसंपादन करण्यात येत आहे. यापैकी ३७.२० किमी रेल्वेमार्ग बारामती तालुक्यातून जातो. या प्रकल्पासाठी बारामती तालुक्यातील काही गावांमधील खासगी जागा संपादित करण्याची प्रक्रिया करण्यात आली. या मार्गासाठी १७६ हेक्टर एवढी जागा संपादित करणे आवश्यक आहे. त्यापैकी १२१ हेक्टर जमीन संपादित करण्यात आली आहे. तर काही दिवसांत ९.६८ हेक्टरएवढी जमीन खरेदी करण्यात येईल. त्यामुळे १३१ हेक्टर जमीन संपादित झाली आहे. मात्र, ४० हेक्टर क्षेत्र संपादन करण्यासाठी तेथील नागरिकांकडून विरोध होत आहे. त्यामुळे ही जमीन सक्तीने संपादन करावी लागणार आहे. त्यासाठी बारामती प्रांताधिकाऱ्यांनी रेल्वे प्रशासनाला सक्तीने भूसंपादन करण्याचा प्रस्ताव दिला असल्याचे जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी सांगितले. या तालुक्यातील सुमारे साडेसात हेक्टर जमीन ही वनविभागाची आहे. ती संपादन करण्यासाठी वनविभागाकडे प्रस्ताव पाठविण्यात आला होता. त्याला मान्यता मिळाली आहे.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Close Bitnami banner
Bitnami