संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Thursday, 29 September 2022

बाईडन यांच्या सुरक्षेत मोठी चूक! अनोळखी विमान घरावरून गेले

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

वॉशिंग्टन- जगात सर्वात कडेकोट सुरक्षा व्यवस्था असलेले अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बाईडन यांच्या सुरक्षेत मोठी चूक झाली. समुद्र किनाऱ्यावरील बायडन यांच्या घरावरून चक्क एक अनोळखी खासगी विमान गेले. या घटनेची पुष्टी व्हाईट हाऊसने दिली. राष्ट्राध्यक्षांच्या बंदी असलेल्या निवासस्थान परिसरात अनोळखी विमानाने घुसखोरी केल्याने त्यांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला. त्यामुळे बायडन आणि त्यांच्या पत्नीला सुरक्षित ठिकाणी न्यावे लागेल, अशी माहिती व्हाईट हाऊसच्या प्रवक्त्याने दिली.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांचे डेलावेअर येथील रेहोबोथ समुद्र किनाऱ्यावर घर आहे. तेथे बायडन आणि त्यांची पत्नी होती. त्यावेळी घरावरून अनोळखी खासगी विमान गेले. हा प्रकार लक्षात आल्यानंतर सुरक्षारक्षकांनी बायडन आणि त्यांच्या पत्नीला सुरक्षित ठिकाणी हलवले. राष्ट्राध्यक्षांच्या सुरक्षेत ही मोठी चूक झाली असल्याचे व्हाईट हाऊसने म्हटले आहे. बंदी असलेल्या क्षेत्रात खासगी विमानाने कशी घुसखोरी केली याची चौकशी सुरू आहे, असे त्यांनी सांगितले. स्थानिक वेळेनुसार १२.४५ च्या सुमारास एक छोटे पांढरे विमान बायडन यांच्या घरावरून गेले. हे विमान त्यांच्या ताफ्यातील फायर स्टेशनकडे जाताना दिसले. त्यानंतर सुरक्षा दलाने वेगाने हालचाली करत बायडन यांना सुरक्षित ठिकाणी नेले. या घटनेमुळे बायडन यांची सुरक्षा आणखी सतर्क झाली आहे.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami