संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Sunday, 04 December 2022

बहुचर्चित ‘अग्निपथ” योजना माहिती अधिकार कक्षेबाहेर

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

नवी दिल्ली- भारतीय सैन्य दलात भरतीसाठी केंद्र सरकारने जाहीर केलेली बहुचर्चित आणि बहुप्रतीक्षित ‘अग्निपथ” योजना ही माहिती अधिकारात येत नाही.
त्यामुळे यासंदर्भात माहिती अधिकाराखाली विचारलेल्या कोणत्याही प्रश्नाला उत्तर देता येणार नाही,असे संरक्षण खात्याने म्हटले आहे.माहिती अधिकार कार्यकर्ते विहार दुर्वे यांनी ‘अग्निपथ ” योजनेसंदर्भात काही प्रश्न विचारले होते.त्यांना त्याबाबत माहिती देण्यास नकार दिला आहे.
केंद्र सरकारची ‘अग्निपथ” योजना ही १८ ते २१ वर्षे वयोगटातील तरुणांना भारतीय सैन्यात अग्निवीर या सेवा करण्याची संधी उपलब्ध करून देते.ही योजना माहिती अधिकारात मोडत नाही.त्यामुळे माहिती पारदर्शकता कायद्याच्या कलम ८ आणि ९ नुसार यासंदर्भात कोणतीही माहिती देता येणार नाही असा निर्णय घेण्यात आला आहे.त्यामुळे संरक्षण खात्याने माहिती अधिकार कार्यकर्ते विहार दुर्वे यांना त्यांच्या प्रश्नांना उत्तर देणे टाळले आहे.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami