संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Friday, 30 September 2022

बर्मिंगहॅम कसोटीत इंग्लंडच्या प्रेक्षकांचे भारतीयांशी गैरवर्तन

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

बर्मिंगहॅम – भारत विरुद्ध इंग्लंड बर्मिंगहॅम कसोटीच्या चौथ्या दिवशी स्टेडियममध्ये इंग्लंडच्या प्रेक्षकांनी भारतीयांशी गैरवर्तन केल्याचे समोर आले आहे. एका नेटकऱ्याने या घटनेबाबत पोस्ट करून सांगितले आहे. एरिक हॉलीज स्टँडमध्ये बसलेल्या भारतीय प्रेक्षकांवर थेट वर्णद्वेषी टिप्पण्या केल्याचे त्याने म्हटले आहे.

महत्त्वाचे म्हणजे इंग्लंड क्रिकेट बोर्डाने याप्रकरणी दिलगिरी व्यक्त करून पुढील कारवाईची प्रक्रिया सुरू केली आहे. ‘अशा प्रतिक्रिया ऐकून आम्हाला धक्का बसला. ट्विटनंतर त्या व्यक्तीशी वैयक्तिकरित्या बोललो असून या प्रकरणाची चौकशी सुरू केली. एजबॅस्टनमध्ये कोणालाही अशी वागणूक देऊ नये. आम्ही एजबॅस्टनमध्ये सर्वांसाठी सुरक्षित आणि स्वागतार्ह वातावरण निर्माण करत आहोत’, असे त्यांनी म्हटले आहे.

दरम्यान, बर्मिंगहॅम कसोटीच्या पहिल्या डावात भारतीय संघाने ४१६ आणि दुसऱ्या डावात २४५ धावा केल्या. तर इंग्लंडने पहिल्या डावात २८४ धावा केल्या होत्या. त्यानंतर १३४ धावांची आघाडी मिळालेल्या भारतीय संघाने इंग्लंडसमोर ३७८ धावांचे लक्ष्य ठेवले. प्रत्युत्तरात चौथ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत इंग्लंडने तीन विकेट्स गमावून २५९ धावा केल्या होत्या.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami