संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Wednesday, 22 March 2023

बदलापुरात शोरूमला आग
पूर्व भागाचा वीज पुरवठा खंडित

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

बदलापूर -अंबरनाथ बदलापूर मार्गावरील कार्मेल शाळेजवळ ऑटोक्राफ्टच्या शोरूमला आज आग लागली. ही घटना सकाळी ७ च्या सुमारास घडली. या आगीत बारा गाड्या जळून खाक झाल्या. गाड्यांमध्ये असलेल्‍या सीएनजीच्या टाक्‍यांचाही स्फोट झाला. स्फोटामुळे आग जास्त भडकली. यावेळी गॅरेजच्या जवळून जाणारी हाय टेन्शन लाईन जळून खाली पडल्याने बदलापूर पूर्व भागाचा वीज पुरवठा खंडित झाला.

बदलापूर व अंबरनाथ अग्निशमन दलाचे प्रमुख भागवत सोनोने यांनी मुलीला शाळेत सोडताना ही घटना पाहिली. त्यांनी तातडीने अग्निशमन दलाला घटनेची माहिती दिली. आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी खूप वेळ लागला. यावेळी रस्त्यावरील रहदारी बंद करण्यात आली. बदलापूर शहरात अनेक अनधिकृत गॅरेजे आणि शोरूम आहेत. याठिकाणी अग्नि सुरक्षिततेची कोणतीही काळजी घेण्यात येत नाही. त्यातच रस्त्यांवर गाड्यांचे पार्किंग केले जाते. त्यामुळे आगीच्या घटना घडतात, असे स्थानिकांचे म्हणणे आहे.

आजचे हवामान
ताज्या बातम्या