संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Saturday, 01 October 2022

बकरीईदला महाराष्ट्रात एकाही गाईची कत्तल होणार नाही याची दक्षता घ्या- राहुल नार्वेकर

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

मुंबई- बकरीईदला महाराष्ट्रात एकाही गाईची कत्तल होणार नाही याची दक्षता घेऊन तशा उपाययोजना करा, असे निर्देश विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी पोलिस महासंचालकांना पाठवलेल्या पत्रात दिले आहेत. १० जुलैला बकरीईद आहे. तेव्हा राज्यात कुठेही गाईची कत्तल होऊ नये यासाठी आवश्यक त्या उपाययोजना करा, अशा सूचना त्यांनी महासंचालकांना दिल्या आहेत.

महाराष्ट्रात सत्तांतरानंतर शिंदे-फडणवीस सरकार सत्तेवर आले. राहुल नार्वेकर यांची विधानसभेच्या अध्यक्षपदी निवड झाली. त्यांनी बकरीइदच्या पार्श्वभूमीवर गोहत्या होणार नाही याची खबरदारी घेण्याची सूचना पोलिस महासंचालकांना केली आहे. महाराष्ट्रात गो-हत्या हा गुन्हा आहे. राज्य सरकारने गोहत्येला बंदी घातली आहे. गोमांस विकणे आणि बाळगणे गुन्हा आहे. त्यासाठी ५ वर्षांची शिक्षा आणि १० हजार रुपयांपर्यंत दंड होऊ शकतो. स्थानिक पातळीवर कत्तलीसाठी योग्य असे प्रमाणपत्र घेऊन वासरे आणि गाईंची कत्तल केली जाऊ शकते. तेव्हा राज्यात कुठेही गाईची कत्तल होणार नाही याची काळजी घ्या, असे त्यांनी महासंचालकांना पाठवलेल्या पत्रात म्हटले आहे. ऑल इंडिया युनायटेड डेमोक्रॅटिक फ्रंटचे प्रमुख आणि खासदार बद्रुद्दीन अजमल यांनीही हिंदूंच्या भावनांचा सन्मान करा. ईदला गाईंची कत्तल करू नका, असे आवाहन केले आहे.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami