संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Thursday, 29 September 2022

बंडखोर आमदारांना खोलीबाहेर मोबाईल नेण्यास परवानगी नाही

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

गुवाहाटी – नेहमी दिवसभर कामात व्यस्त असणाऱ्या आणि सध्या गुवाहाटीतील हॉटेलात बंदिस्त असलेल्या शिवसेनेच्या बंडखोर आमदारांना सध्या काहीच काम नाही. त्यातून हॉटेलबाहेर पडण्याची त्यांना परवानगी नाही. कुटुंबाशी बोलायला परवानगी आहे मात्र अनावश्यक माहिती बाहेर जाऊ नये म्हणून खोलीबाहेर मोबाईल आणायला परवानगी नाही. नवीन कुणी आमदार गुवाहाटीमध्ये येऊन या गटात सामील झाला तर त्याचे स्वागत करायला सर्वजण लॉबीमध्ये येतात पण फोटो कुणी काढायचा आणि मिडियाकडे कुणी पाठवायचा याचे नियोजन अगोदरच केले जाते असे समजते. दरम्यान, नुकताच भंडारा येथील आमदार नरेंद्र भोंडेकर यांचा वाढदिवस याठिकाणी साजरा करण्यात आला.

यातील काही आमदारांच्या निलंबनाबाबत बजावलेल्या नोटीसीला सुप्रीम कोर्टाकडून दिलासा मिळाला आहे, मात्र तरीही या आमदारांचे मनोधैर्य कायम राहावे यासाठी नेते एकनाथ शिंदे रोजच्या रोज त्यांना काय काय घडतेय त्याची माहिती देत आहेत. कधी कधी भाजपचे नेते येथे येऊन त्यांच्या भेटी घेत आहेत असेही कळते आहे. या गटाला आणखी काही दिवस येथेच काढावे लागतील अशी चिन्हे सध्या दिसत आहेत.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami