संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Tuesday, 31 January 2023

बँकिंग क्षेत्रात मोठी उलाढाल; अ‍ॅक्सिसने केली सिटी बँकेची खरेदी

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

अॅक्सिक बँकेने अमेरिकेची कंपनी सिटी ग्रुपचा भारतातील व्यवसाय खरेदी केला आहे. बुधवारी १२ हजार ३२५ कोटी रुपयांना हा व्यवहार झाला असून सीटी बँकेचा क्रेडिट कार्ड बिझनेस, रिटेल बँकिंग, वेल्थ मॅनेजमेंट आणि कंझ्युमर लोन्स बिझनेस अ‍ॅक्सिसच्या ताब्यात आला आहे. तसेच, या व्यवहारामुळे सिटी बँकेचे क्रेडिट कार्डचे ग्राहक रिवॉर्ड पॉईंट आणि अन्य सुविधा घेऊ शकणार आहेत.

या व्यवहाराची नियामकीय मंजुरी मिळणे बाकी असून पुढील ९ ते १२ महिन्यांत सर्वप्रक्रिया पूर्ण होण्याची शक्यता असल्याची माहिती अॅक्सिस बँकेने शेअर बाजाराला दिली. या करारामध्ये सिटीकॉर्प फायनान्स इंडिया लिमिटेड, सिटीची नॉन-बँकिंग वित्तीय कंपनी (NBFC) च्या ग्राहक व्यवसायाचाही समावेश आहे.

अमेरिकन कंपनी सिटी बँक १९०२ पासून भारतात आहे. तर, १९८५ पासून बँकिंग व्यवसायात कार्यरत आहे. या बँकेच्या भारतात एकूण ३५ शाखा असून या शाखांमधून ४ हजार ग्राहक बँकिंग व्यवसायात आहेत. मुंबई, पुणे, बंगळुरू, चेन्नई आणि गुरुग्राम येथे ग्लोबल बिझनेस सपोर्ट सेंटर्स आहेत. करार पूर्ण झाल्यानंतर, हे सर्व अ‍ॅक्सिस बँकेचे भाग बनतील. याशिवाय सिटी बँक इंडियाचे सुमारे ३० लाख ग्राहकही अ‍ॅक्सिस बँकेत विलीन होतील. या करारानंतर अ‍ॅक्सिस बँकेच्या कार्ड ग्राहकांची संख्या सुमारे 31 टक्क्यांनी वाढेल.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Close Bitnami banner
Bitnami