मुंबई : स्त्रियांनी आता सर्वच क्षेत्रात उत्तुंग भरारी घेतली आहे. त्यात जगभरात विविध क्षेत्रात भारतीय स्त्रियांचे वर्चस्व कायम असल्याचे पहायला मिळते. एवढंच नाही तर जगातील सर्वात शक्तिशाली महिलांमध्येही भारतीयांचा दबदबा कायम असून,अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्यासह सहा भारतीय महिलांचा फोर्ब्सच्या जगातील सर्वात शक्तिशाली १०० महिला २०२२च्या यादीत समावेश करण्यात आला आहे
अर्थमंत्री निर्मला सीतारमन या ३६ व्या स्थानावर आहेत.विशेष म्हणजे त्यांनी सलग चौथ्यांदा या यादीत आपला स्थान कायम ठेवले आहे हे विशेष. अर्थमंत्री निर्मला यांच्यासह जगातील १०० शक्तिशाली महिलांच्या यादीत समाविष्ट झालेल्या भारतीय महिलांमध्ये बायोकॉनच्या कार्यकारी अध्यक्षा किरण मजूमदार-शॉ आणि नायका च्या संस्थापक फाल्गुनी नायर यांचा समावेश आहे. यादीत या दोन्ही भारतीय महिला अनुक्रमे ७२व्या आणि ८९व्या स्थानावर आहेत.यांच्याशिवाय, एचसीएल टेक चेअरपर्सन रोशनी नादर मल्होत्रा फोर्ब्सच्या यादीत ५३ व्या स्थानी आहेत. त्याच वेळी भारतीय सुरक्षा आणि विनिमय मंडळाच्याबी अध्यक्षा माधबी पुरी बुच या जगातील ५४ सर्वात शक्तिशाली महिला ठरल्या आहेत. या यादीतील पुढचं भारतीय नाव स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया च्या अध्यक्षा सोमा मंडल यांचे आहे, त्यांना ६७ वी सर्वात शक्तिशाली महिला मानण्यात आले आहे.
तर दुसरीकडे रशिया-युक्रेन युद्धादरम्यान उर्सुला यांच्या नेतृत्वाव्यतिरिक्त, कोविड -१९ रोगाचा सामना करण्यासाठी केलेल्या प्रयत्नांसाठी युरोपियन कमिशनच्या अध्यक्षा उर्सुला वॉन डेर लेयन या जगातील सर्वात शक्तिशाली महिला म्हणून फोर्ब्सच्या यादीत पहिल्या स्थानावर ठेवण्यात आले आहे. तर या यादीत युरोपियन सेंट्रल बँकेच्या अध्यक्ष क्रिस्टीन लगार्ड यांना दुसऱ्या क्रमांकावर ठेवण्यात आलं आहे. भारतीय वंशाच्या अमेरिकन उपराष्ट्रपती कमला हॅरिस यांना जगातील तिसरी सर्वात शक्तिशाली महिला मानण्यात आलं आहे.