संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Monday, 28 November 2022

फेसबुकचे संस्थापक मार्क झुकेरबर्गचे १०० अब्ज डॉलरचे आर्थिक नुकसान

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

नवी दिल्ली- मेटा कंपनीचे मालक आणि फेसबुकचे संस्थापक मार्क झुकरबर्गला मोठा आर्थिक फटका बसला आहे.१३ महिन्यांमध्ये मार्क झुकरबर्गला १००अब्ज डॉलरचे नुकसान झाले आहे. मेटा प्लॅटफॉर्मच्या कमाईत सातत्याने घट होताना पाहायला मिळत आहे. गेल्या तिमाहीमध्ये मेटा प्लॅटफॉर्मच्या कमाईमध्ये ११ अब्ज डॉलरची घट झाली आहे. गेल्या वर्षभराच्या कालावधीपासून मार्क झुकरबर्गला मोठा आर्थिक फटका बसल्याचे दिसत आहे. यामुळे झुकरबर्गला संपत्तीत मोठे नुकसान झाल्याचे दिसत आहे. जगातील अनेक श्रीमंत व्यक्तींना यंदा मोठा आर्थिक फटका बसला आहे.या यादीत मेटा कंपनीचे मालक मार्क झुकरबर्गचे नाव आघाडीवर आहे.
ब्लूमबर्ग अब्जाधीश निर्देशांकानुसार,झुकेरबर्गची संपत्ती आता ३८.१ अब्ज डॉलर्स आहे.सप्टेंबर २०२१ मध्ये झुकेरबर्गची संपत्ती १४२ अब्ज डॉलर्स होती. त्यामुळे यावरून झुकरबर्गच्या संपत्तीत मोठी घसरण झाल्याचे दिसून येत आहे.सलग दुसऱ्या तिमाहीत मेटा कंपनीचा महसूल घसरला आहे.मेटा कंपनीचा वार्षिक महसूल गेल्या वर्षाच्या तुलनेत ४.५ टक्क्यांनी घसरला आहे. मेटाच्या शेअर्समध्येही घसरण पाहायला मिळत आहे.गुरुवारी न्यूयॉर्कमध्ये मेटाचे शेअर्स २५ टक्क्यांनी खाली घसरले होते.मेटा कंपनीच्या मालकीच्या फेसबुक या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरील अनेक युजरचे फॉलोअर्स कमी झाले आहेत.ज्यांच्या अकाऊंटवर लाखो फॉलोअर्स होते त्यांची संख्या कमी होऊन फक्त १० हजारांवर आली आहे. फक्त फेसबुक युजर्सचेच नाही तर फेसबुकचा संस्थापक मार्क झुकेरबर्गच्या फॉलोअरमध्ये देखील लक्षणीय घट झाले आहे.११ कोटी नऊ लाख फॉलोअर्स असलेल्या झुकेरबर्गचे आता केवळ ९ हजार ९९४ इतकेच फॉलोअर्स उरले आहेत. परंतु,यातील काही युजर्सचे फॉलोअर्स रिकव्हर झाले आहेत.फॉलोअर्स कमी झाल्यामुळे अनेकांनी फेसबुकवरून आपले अकाऊंट बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. फॉलोअर्स कमी होण्याचे कारण मात्र स्पष्ट झालेले नाही.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami