संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Saturday, 01 April 2023

फिल्मसिटीत भीषण आग! मालिकेचा सेट जळून झाक

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

मुंबई- मुंबईच्या गोरेगाव पूर्वेकडील दादासाहेब फाळके चित्रनगरीमध्ये एका हिंदी टीव्ही मालिकेच्या सेटवर भीषण आग लागली. ‘गुम है किसी के प्यार मैं’ या मालिकेचे शूटिंग सुरू असताना अचानक आग लागली. कलाकारांना सुखरूप बाहेर काढण्यात आले. घटनास्थळी अग्निशमन दलाच्या गाड्या दाखल झाल्या. आगीवर नियंत्रण आणण्याचे प्रयत्न उशिरापर्यंत सुरू होते. आगीत कोणतीही जिवीतहानी झाली नसल्याचे प्राथमिक वृत्त होते.

वसई केमिकल फॅक्टरीच्या आगीत एकाचा मृत्यू

वसईच्या सातिवली येथील तुंगारपाडा जवळ एका केमिकल फॅक्टरीला गुरुवारी ४च्या सुमारास आग लागली होती. या आगीत एका ८५ वर्षीय वृद्ध महिलेचा मृत्यू झाला. शिवाय तीन जणांवर जवळच्या रुग्णलयात उपचार सुरु आहेत. सध्या त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. वसईत तुंगारपाडा जवळ एका केमिकल फॅक्टरीत थिनरने भरलेल्या ड्रमला शॉक सर्किटमुळे आग लागली. आगीचा स्पॉट एकामागून एक होत होता. यात सुरैया बानू अजगर अली या ८५ वर्षीय महिलेचा मृत्यू झाला. तर, दिनेश पासवान, कमलेश यादव आणि विजय यादव हे तिघे जण जखमी झाले आहेत.

आजचे हवामान
ताज्या बातम्या