संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Saturday, 28 January 2023

फडणवीस मुख्यमंत्री व्हावेत बावनकुळेंची इच्छा

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

नागपूर- मी भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदी असेपर्यंत देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री व्हायला हवेत असे विधान प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले आहे. त्यांच्या या विधानामुळे राजकीय चर्चाना उधाण आले आहे. पूर्व नागपुरात संत जगनाडे महाराज पुण्यतिथी सोहळ्यानिमित्त आयोजित कार्यक्रमात बावनकुळे बोलत होते. या कार्यक्रमाला फडणवीसही उपस्थित होते.

उपस्थित लोकांना संबोधित करताना चंद्रशेखर बावनकुळे आपल्या भाषणात म्हणाले, “जो-जो समाज त्यांच्याकडे गेला, ज्या-ज्या समाजावर अन्याय झाला. तो अन्यान देवेंद्र फडणवीसांनी दूर करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे आज आपली सर्वांची जबाबदारी आहे, किमान मी भाजपाचा प्रदेशाध्यक्ष असेपर्यंत देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले पाहिजेत. त्यासाठी आपण सर्वांनी त्यांच्या पाठिशी उभं राहिलं पाहिजे. महाराष्ट्राचं भविष्य केवळ देवेंद्र फडणवीस बदलू शकतात. खंर तर, हा कार्यक्रम तेली समाजाने आयोजित केला होता. या कार्यक्रमाला ओबीसी समाजाचे अनेक लोक उपस्थित होते. यावेळी बावनकुळेंनी हे विधान केलं आहे. फडणवीस हे जाती-पातीच्या पलीकडे गेलेले नेते आहेत. ते सर्व समाजासाठी काम करतात. म्हणून आपली सर्वांची जबाबदारी आहे की २०१४ ते २०१९ चा काळ पुन्हा महाराष्ट्रात आला पाहिजे. देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे काय झाले पाहिजेत? असा प्रश्न विचारत बावनकुळेंनी लोकांकडूनच प्रतिसाद घेतला. लोकांनी ‘मुख्यमंत्री’ असं उत्तर दिल्यानंतर बावनकुळेंनी संबंधित विधानाला सहमती देत पुढील भाषण केलं.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Close Bitnami banner
Bitnami