संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Wednesday, 22 March 2023

फडणवीस जगातले दहावे आश्चर्य
संजय राऊतांची उपरोधिक टीका

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

मुंबई-‘देवेंद्र फडणवीस जगातले दहावे आश्चर्य आहे. आधीच आठ आश्चर्य या जगात आहेत. आणखी दोन आश्चर्य दिल्लीत आहेत, आणि एक आश्चर्य महाराष्ट्रात आहे, देवेंद्र फडणवीस धादांत खोट बोलतात. त्यांनी आपली वक्तव्य स्वत: तपासावी, असे म्हणत ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी फडणवीसांवर उपरोधिक टीका केली आहे. देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवार यांच्याशी चर्चा करूनच पहाटेचा शपथविधी झाला होता,असा गौप्यस्फोट केल्यामुळे राज्यात एकच खळबळ उडाली आहे. संजय राऊत यांनी फडणवीसांच्या दाव्यावर प्रतिक्रिया दिली. ते पुढे म्हणाले की, मुख्यमंत्रीपदाबात तुम्ही शिवसेना विश्वासघात केला आहे.अडीच वर्ष मुख्यमंत्रीपदाचे ठरले होते. अमित शाह यांच्यासमोर फडणवीस काय बोलले होते. सत्तेच वाटप फिप्टी फिप्टीचे त्यांनी मान्य केले होते. मात्र यांनी विश्वासघात केला. सहा महिन्यापूर्वी ४० आमदारांचा महाराष्ट्रात जो शपथविधी झाला तोही शरद पवार यांच्या सांगण्यावरुन झाला असेही देवेंद्र फडणवीस सांगू शकतात असे राऊत म्हणाले.
विधान परिषद निवडणूक परभवातून आलेल्या वैफल्यातून ते बोलत आहे. अजित पवार ठामपणे महाविकास आघाडीच नेते म्हणून महाराष्ट्रात वातावरण तयार करत आहेत. भाजपला आव्हान देत आहेत. त्यामुळे फडणवीसांनी कितीही खोटी वक्तव्य केली तरी लोकांचा विश्वास बसणार नसल्याचे राऊत म्हणाले.

आजचे हवामान
ताज्या बातम्या