संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Thursday, 29 September 2022

प्लॅस्टिकच्या स्ट्रॉ, काटे, चाकू चमच्यांवर १ जुलैपासून बंदी

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

नवी दिल्ली – केंद्र सरकारने १ जुलैपासून देशात सिंगल यूज प्लास्टिकपासून बनवलेल्या वस्तूंवर बंदी घालण्याची घोषणा केली आहे. पर्यावरण मंत्रालयाने यासंदर्भात माहिती दिली आहे. प्लास्टिकपासून बनलेली वस्तू जी वापरानंतर फेकून दिली जाते अशा प्लास्टिकच्या वस्तूंच्या कचऱ्यामुळे संपूर्ण पर्यावरणाला हानी पोहोचत असल्याने पर्यावरण मंत्रालयाकडून हे निर्बंध घालण्यात आले असल्याची माहिती देण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पर्यावरण मंत्रालयाच्या सूचनेनुसार, १ जुलै २०२२ पासून, प्लास्टिकच्या वस्तूंचे उत्पादन,आयात, साठा, वितरण, विक्री आणि वापर यावर बंदी असेल. बंदी असलेल्या वस्तूंमध्ये प्लास्टिकच्या काड्यांचाही समावेश आहे, ज्याचा वापर फुगे, इअरबड्स, आईस्क्रीम, कँडीमध्ये केला जातो. याशिवाय प्लॅस्टिक कप, ग्लास, चमचे, काटे, चाकू, स्ट्रॉ आणि १०० मायक्रॉनपेक्षा कमी जाडीचे प्लास्टिक किंवा पीव्हीसीपासून बनवलेले बॅनर यावरही बंदी आहे. बंदी घातलेल्या वस्तूंच्या यादीमध्ये मिठाईचे बॉक्स, सिगारेटची पाकिटे, निमंत्रण पत्रिकांवर ठेवलेल्या पातळ प्लास्टिकच्या फॉइलचाही समावेश आहे. यामध्ये ७५ मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या प्लास्टिक कॅरी बॅग, पिशव्यांच्या उत्पादन, आयात, वितरण, विक्री आणि वापरावर बंदी घालण्यात आली आहे. त्याचबरोबर यावर लक्ष केंद्रित करण्यासाठी राष्ट्रीय आणि राज्य स्तरावर नियंत्रण कक्ष स्थापन केले जाणार असल्याची माहिती पर्यावरण मंत्रालयाने दिली आहे. तसेच विशेष अंमलबजावणी पथकेही तयार केली जाणार असून, राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना या निर्बंधाची अंमलबजावणी करण्यासाठी त्यांच्या सीमेवर चौक्या उभ्या केल्या जातील जेणेकरून या प्लास्टिक वस्तूची एका राज्यातून दुसऱ्या राज्यात होणारी वाहतूक थांबवता येईल.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami