संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Sunday, 04 December 2022

प्रोड्यूसर एकता कपूरला दिलासा! अटक वॉरंटला हायकोर्टाची स्थगिती

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

पाटना- ट्रिपल एक्स वेब सीरिज प्रकरणात टीव्ही मालिका निर्माती एकता कपूरला पाटणा उच्च न्यायालयाने आज मोठा दिलासा दिला. बेगुसराय न्यायालयाच्या अटक वॉरंटला स्थगिती दिली. त्यामुळे सध्या तरी एकता आणि शोभा कपूर यांच्यावर कोणतीही कारवाई होणार नाही. अटकेतून त्यांना दिलासा मिळाला आहे. कोर्टाने तक्रारदाराला नोटीस बजावून बाजू मांडण्यास सांगितले आहे. यावर पुढील सुनावणी डिसेंबरमध्ये होणार आहे. त्यामुळे एकताला आता बेगुसराय न्यायालयात जाण्याची गरज नाही.

ओटीटी प्लॅटफॉर्मवरील ट्रिपल एक्स वेब सीरिजच्या कंटेंटबाबत बराच वाद झाला होता. बिहारच्या बेगुसरायमधील माजी सैनिकाने एकता कपूरविरोधात गुन्हा दाखल केला आहे. वेब सिरीजच्या एका एपिसोडमध्ये सैनिकाच्या पत्नीची दृश्ये दुर्भावनापूर्णपणे दाखवली होती. त्यामुळे सर्व सैनिकांच्या भावना दुखावल्या आहेत, असा तक्रारदाराचा आरोप आहे. बेगुसराय न्यायालयाने गेल्या महिन्यात एकता कपूर आणि शोभा कपूर यांच्याविरोधात अटक वॉरंट जारी केले होते. त्यानंतर त्यांच्यावर अटकेची टांगती तलवार होती. एकता आणि शोभा कपूरने कनिष्ठ न्यायालयाच्या वॉरंटविरोधात उच्च न्यायालयात अपील केले होते. त्यात त्यांना तूर्त दिलासा मिळाला आहे.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami