टेक्सास- प्रसिद्ध अभिनेता आणि पॉवर रेंजर फेम जेसन डेविड फ्रँकचे निधन झाल्याने आज एकच हळहळ व्यक्त होत असून वयाच्या 49 व्या वर्षी टेक्सासमध्ये त्याने अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनाची माहिती समजताच पॉवर रेंजरचे फॅन असलेल्या चाहत्यांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.फ्रँक्स ऑन द पॉवर रेंजर्सचा कलाकार वॉल्टर जोन्सने इंस्टाग्रामवर एक पोस्ट शेअर करुन जेसन डेविड फ्रँकला श्रद्धांजली वाहिली.
फ्रँकने 28 ऑगस्ट 1993 ते 27 नोव्हेंबर 1995 या कालावधीत शोच्या पहिल्या सीझनमध्ये टॉमी ऑलिव्हरची भूमिका केली होती. ग्रीन रेंजर म्हणून त्याची भूमिका चौदा भागांनंतर संपली. परंतु त्याच्या लोकप्रियतेमुळे त्याला व्हाइट रेंजर आणि उर्वरित मालिकेसाठी संघाचा नवीन कमांडर म्हणून परत बोलावण्यात आले होते.वॉल्टर जोन्सने एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला. या फोटोला दिलेल्या कॅप्शनमध्ये वॉल्टर जोन्सने लिहिले की, तू आम्हाला सोडून गेला आहेस, यावर माझा विश्वास बसत नाही. आमच्या स्पेशल फॅमिलीमधील एक सदस्य कमी झाला. वॉल्टर ई. जोन्सच्या या पोस्टला कमेंट करुन जेसन डेविड फ्रँकच्या चाहत्यांनी त्याला श्रद्धांजली वाहिली.