संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Wednesday, 30 November 2022

प्रसिद्ध विनोदी अभिनेते पराग कंसारा यांचे निधन

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

मुंबई – प्रसिद्ध कॉमेडियन पराग कंसारा यांचे निधन झाले. राजू श्रीवास्तवच्या निधनाच्या धक्क्यातून कॉमेडी जगत सावरण्यापूर्वीच हा दुसरा धक्का बसला आहे, असे परागचे मित्र आणि कॉमेडियन सुनील पाल यांनी सांगितले.
पराग कंसारा गुजरातच्या वडोदरा येथील रहिवासी होते. “द ग्रेट इंडियन लाफ्टर चॅलेंज’ या लोकप्रिय “कॉमेडी शो’मध्ये त्यांनी भाग घेतला होता. पहिल्या सीजनमध्ये चाहत्यांची मने जिंकली. त्यानंतर अनेक कॉमेडी शोमध्ये त्यांनी काम केले. मात्र गेल्या काही वर्षांपासून ते या क्षेत्रापासून लांब होते. त्यांच्या जाण्याने एक जवळचा मित्र गमावला, असे पाल यांनी म्हटले आहे.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami