संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Saturday, 28 January 2023

प्रसिद्ध चिनी शाओमी कंपनीचा भारतातील वित्तीय व्यवसाय बंद

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

एमआय पे,एमआय क्रेडिट कार्ड वापरास मनाई

नवी दिल्ली- शाओमी म्हणजेच रेडमी समार्टफोनच्या वापरकर्त्यांसाठी एक निराशाजनक आहे.त्यात एमआय पे आणि एमआय क्रेडिट अॅप वापरत असाल,तर आता हे अॅप ग्राहकाला वापरता येणार नाही.कारण आता चायनीज स्मार्टफोन निर्माती कंपनी शाओमी कॉर्पोरेशनने भारतामध्ये आपला फाइनॅन्शिअल बिझनेस म्हणजेच वित्तीय व्यवसाय बंद केला आहे.
अलीकडेच कंपनीने प्ले स्टोअर आणि देशात आपल्या अॅप स्टोअरमधून एमआय पे आणि एमआय क्रेडिट अॅप काढले आहे. एमआय पेने युजर्सना देशातील यूपीआय नेटवर्कवर ट्रान्झॅक्शनची परवानगी दिली होती,मात्र आता तीदेखील एनपीसीआयद्वारे स्वीकृत यूपीआय अॅप्सच्या यादीतून काढून टाकली आहे. शाओमीचे फायनॅन्शिअल सर्व्हिस डिव्हिजन अचानक बंद होणे,हा कंपनीसाठी मोठा धक्का आहे.मार्च २०१९ मध्ये शाओमीने भारतात एमआय पे लाँच केले होते.कंपनीच्या अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, त्यावेळी देशात या एकट्या अॅपचे २० मिलियनपेक्षा जास्त रजिस्टर्ड युजर्स होते.
कंपनीच्या प्रवक्त्याने न्यूज एजन्सी रॉयटर्सला सांगितले की, “मार्च २०२२ मध्ये वार्षिक धोरणात्मक मूल्यांकनादरम्यान मुख्य व्यवसाय सेवांवर लक्ष केंद्रित करण्यासाठी आम्ही एमआय फायनॅन्शिअल सर्व्हिसेस बंद केल्या आहेत.” शाओमीला भारतात कथित कर चुकवल्यामुळे कडक चौकशीला सामोरे जावे लागत आहे.एप्रिलमध्ये, भारताच्या सेंट्रल इन्व्हेस्टिगेशन एजन्सीने शाओमीची ६७.६ कोटी डॉलर्सची मालमत्ता ताब्यात घेतली होती. कंपनीने बेकायदेशीरपणे रॉयल्टी म्हणून परदेशात पैसे पाठवल्याचा दावा तपासात करण्यात आला.मात्र,चिनी स्मार्टफोन कंपनी शाओमीने हे आरोप फेटाळून लावले होते.आता कंपनीवर त्यांचे फायनॅन्शिअल अॅप्स बंद करण्याची वेळ आली आहे.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Close Bitnami banner
Bitnami