संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Monday, 28 November 2022

प्रवाशांच्या अल्प प्रतिसादामुळे कोकणची डबल डेकर ट्रेन बंद

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

मुंबई – लोकमान्य टिळक टर्मिनस ते मडगाव दरम्यान कोकण रेल्वे मार्गावर धावणारी वातानुकूलीत डबल डेकर एक्सप्रेस बंद करण्याचा निर्णय मध्य रेल्वेने घेतला. गणेशोत्सव वगळता या ट्रेनला प्रवाशांचा फारसा प्रतिसाद मिळत नाही. ट्रेनला चार डबेच डबल डेकर असले तरी रेल्वे सुरक्षेचा नियमही अडकाठी ठरत होता. त्यामुळे रेल्वेने हा निर्णय घेतला.
सुरेश प्रभू रेल्वेमंत्री असताना त्यांनी २०१५ मध्ये कोकण रेल्वे मार्गावर प्रवाशांच्या सोयीसाठी लोकमान्य टिळक टर्मिनस ते मडगाव दरम्यान वातानुकूलित डबल डेकर एक्सप्रेस सुरू केली. ही द्विसाप्ताहिक ट्रेन होती. तिला प्रवाशांचा फारसा प्रतिसाद मिळत नाही. गणेश उत्सव आणि सणांच्या काळात तिचे बुकिंग होते. मात्र नंतर प्रवाशांचा फारसा प्रतिसाद मिळत नाही. त्यामुळे ती ट्रेन बंद केली आहे. आता नव्या रचनेनुसार कुर्ल्याच्या लोकमान्य टिळक टर्मिनस येथून ११०९९ ही ट्रेन ४ नोव्हेंबरपासून दर गुरुवार, शुक्रवार, शनिवार आणि रविवारी रात्री १२.४५ वाजता सुटते आणि मडगावला ११.३० वाजता पोहोचेल. परतीच्या प्रवासात गुरुवार, शुक्रवार, शनिवार आणि रविवारी दुपारी १२.४५ वाजता मडगाव येथून सुटेल आणि टिळक टर्मिनसला ११.४५ वाजता पोहोचेल. जुनी गाडी सकाळी ५.३० वाजता सुटत होती. हे रेल्वे स्थानक अडगळीच्या ठिकाणी असल्याने प्रवाशांना तेथे पोहोचणे अवघड जात होते. त्यामुळे ही गाडी बंद केली आहे.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami