संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Thursday, 01 December 2022

प्रत्येक सफाई कामगाराला मालकीचे घर! उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे आश्वासन

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

मुंबई- रस्त्यांची सफाई करणाऱ्या सफाई कामगारांना मुंबईत मालकी हक्काचे घर देण्याबाबतचा शासन निर्णय तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 2015 साली घेतला. मात्र हा निर्णय आम्ही मान्य करणार नाही असे लेखी उत्तर मुंबई पालिकेने नगरविकास खात्याला दिले. यामुळे संतप्त सफाई कामगारांनी आंदोलन सुरू केले. सफाई कामगार घरहक्क आंदोलन यांनी पुढाकार घेऊन जनजागृती करीत 12 डिसेेंबर रोजी पालिकेवर मोर्चाची घोषणा केली.
दरम्यान, काल घरहक्क आंदोलनचे कार्यकर्ते आणि म्युनिसिपल संघाचे कार्यकर्ते यांनी मंत्रालयात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आणि पालिकेची अन्यायी भूमिका त्यांच्यासमोर मांडली. यावर ना. देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले की, प्रत्येक सफाई कामगाराला मालकीचे घर देणार असे मी आताच अधिवेशनात जाहीर केले आहे. त्याचा लेखी निर्णय एक आठवड्यात तयार होईल. आता ज्या वसाहतींचा पुनर्विकास होत आहे ती घरे मालकी हक्काने दिली जातील आणि आणखी जमीन लागल्यास त्याचा शोध घेतला जाईल. पालिकेची भूमिका मी रद्द केली आहे. त्यांना आमचा निर्णय अंमलात आणावाच लागेल.
महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दालनात सफाई कर्मचारी मालकी घर हक्क जन आंदोलन मुंबई व म्युनिसिपल कामगार संघ यांच्या संयुक्त शिष्टमंडळाने सफाई कामगारांच्या मालकी घरांसाठी भेट घेतली. त्यावेळी जयश्री खाडिलकर-पांडे ( नवाकाळ), संजिवन पवार (सरचिटणीस मुं. म्यु. कामगार संघ), दिपक जाधव (सह-सरचिटणीस), ए.डी. साळुंके (माजी उपाध्यक्ष), रविंद्र तांबे, अशोक जाधव, दिपक फणसगावकर, मंगेश साळुंके, अशोक कामतेकर, सुरेंद्र कांबळे, राजेश जाधव (सर्व घर हक्क आंदोलनाचे कार्यकर्ते) उपस्थित होते.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami