संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Thursday, 29 September 2022

प्रत्येक कुटुंबाला वर्षाला ३ सिलिंडर मोफत! गोवा सरकारचा निर्णय

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

पणजी: नेहमीच होणारी इंधन दरवाढ तसेच वाढत्या महागाईमुळे जनता त्रस्त झाली आहे. महागाईच्या पार्श्वभूमीवर गोवा सरकारने मोठी घोषणा केली आहे. सरकारने प्रत्येक कुटुंबाला वर्षाला ३ गॅस सिलिंडर मोफत देण्याचा निर्णय घेतला आहे. गोवा सरकारच्या या निर्णयामुळे येथील जनतेला दिलासा मिळाला असून, गाव सरकारच्या निर्णयाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

दरम्यान, या महागाईमुळे विरोधकांकडून होणारी आंदोलने आणि जनतेचा राग लक्षात घेऊन केंद्र सरकारने देखील पेट्रोल-डिझेलच्या दरात कपात केली. तसेच, उज्ज्वला योजनेतील गॅस सिलेंडरवर २००रुपये सबसिडीही दिली. त्यामुळे आता, गोवा सरकारने सर्वसामान्यांना दिलासा देणारा हा निर्णय जाहीर केला आहे. त्यानुसार, गोव्यातील प्रत्येक कुटुंबाला वर्षाला ३ सिलेंडर मोफत मिळत आहेत. विशेष म्हणजे, पहिल्याच मंत्रिमंडळ बैठकीत हा मोठा निर्णय घेत गोवा सरकारने भारतीय जनता पक्षाने आपल्या निवडणूक जाहीरनाम्यात दिलेल्या आश्वासनानुसार राज्यातील प्रत्येक कुटुंबाला तीन एलपीजी सिलिंडर मोफत देण्याची घोषणा केली आहे. मंत्रिमंडळाच्या बैठकीत मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी ही घोषणा केली. महागाईने त्रस्त झालेल्या जनतेला गोवा सरकारने दिलासा दिल्यानंतर आता इतर राज्यातही मोफत गॅस सिलेंडरची मागणी होत आहे. दरम्यान, मुख्यमंत्री सावंत यांनी ट्विट करुन याबाबत माहिती दिली होती. नवीन आर्थिक वर्षापासून भाजपच्या जाहीरनाम्याीतल घोषणेनुसार नागरिकांना वर्षाला ३ सिलेंडर मोफत देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, असे त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे. आता महाराष्ट्र सरकारनेही असा निर्णय घ्यावा, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami