संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Sunday, 04 December 2022

प्रताप सरनाईक पुन्हा अडचणीत! राखीव भूखंड लाटल्याचा आरोप

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

मुंबई – आधी टॉप्स ग्रुप आणि एनएसइएल घोटाळ्यातील आरोपांप्रकरणी अडचणीत असलेले शिवसेनेचे बंडखोर आमदार प्रताप सरनाईक यांच्या अडचणीत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. सरनाईक यांच्याविरोधात ठाण्यामध्ये दफनभूमीसाठी राखीव असलेला ३७ हजार चौरस मीटर भूखंड बहुमजली इमारत बांधण्यासाठी हडपल्याप्रकरणी उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे.अवर लेडी ऑफ मर्सी चर्चमधील रहिवाशांनी सरनाईक यांच्याविरोधात ही जनहित याचिका दाखल केली आहे.

ठाण्यात ख्रिश्चन समाजासाठी दफनभूमी जागा अपुरी आहे.त्यामुळे महापालिकेने दोन विकास आराखड्यांत शहरासाठी १० भूखंड राखीव ठेवले होते. मात्र,एकही भूखंड हस्तांतरित केलेला नाही. भायंदर पाडा,जीबी रोड जवळ मेट्रो स्टेशन प्रस्तावित आहे, तिथे दफनभूमीसाठी भूखंड राखीव ठेवण्यात आला होता.या भूखंडाची सद्य:स्थिती पाहण्यासाठी याचिकाकर्ते गेले असता
प्रताप सरनाईक यांच्या विहंग ग्रुप ऑफ कंपनीजच्या बहुमजली इमारतीसाठी संबंधित भूखंड अनारक्षित केल्याचे समजले. दरम्यान, ही माहिती याचिकाकर्त्यांच्या वकिलांनी न्यायालयात सादर केल्यानंतर न्यायालयाने सरनाईक यांच्या कंपनीला प्रतिवादी करण्याची मुभा याचिकाकर्त्यांना दिली आहे.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami