न्यूयॉर्क – संयुक्त राष्ट्रांचे सरचिटणीस अँटोनियो गुटेरेस यांनी इंडो-कॅनडियन अफशान खान यांची पोषण मोहिमेची ‘स्केलिंग अप न्यूट्रिशन मूव्हमेंट’ समन्वयक म्हणून नियुक्ती केली आहे. ‘स्केलिंग अप न्यूट्रिशन मूव्हमेंट’ ही ६५ देश आणि चार भारतीय राज्यांच्या नेतृत्वाखाली २०३० पर्यंत सर्व प्रकारचे कुपोषण संपवण्यासाठी सुरू केलेली मोहीम आहे, असे महासचिवांचे प्रवक्ते स्टीफन दुजारिक यांनी न्यूयॉर्कमधील यूएन मुख्यालयात सांगितले. अफशान खान या नेदरलँडच्या गेड वर्बर्गची जागा घेतील.भारतात जन्मलेल्या खान ‘स्केलिंग अप न्यूट्रिशन मूव्हमेंट’ सचिवालयाचे प्रमुख असतील.यूकेचे दुहेरी नागरिकत्व असलेल्या खान यांनी मॅकगिल विद्यापीठातून सार्वजनिक धोरणात पदव्युत्तर पदवी आणि राज्यशास्त्रात पदवी प्राप्त केली आहे.