संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Thursday, 29 September 2022

पोलीस भरती सराव करणाऱ्या दोघांनी एसटीमुळे हात गमावले

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

बुलढाणा – महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या एसटी बसच्या बाहेर आलेल्या पत्र्यामुळे पोलीस भरतीचा सराव करत असलेल्या एका तरुणासह शेतकर्‍याला आपला हात गमवावा लागल्याची दुर्दैवी घटना जिल्ह्यातील मलकापूर तालुक्यातील आव्हा गावाजवळ घडली.या घटनेनंतर संतप्त ग्रामस्थांनी मलकापूर डेपोत तोडफोड केली.
मलकापूरवरून पिंपळगाव देवीकडे जाणाऱ्या या बसने काल सकाळी ६ वाजता आव्हा गावाजवळ तिघा जणांना गंभीर जखमी केले. यामध्ये ४५ वर्षीय शेतकरी परमेश्वर सुरडकर यांचा हात कापला गेला.त्यांना तातडीने मलकापूर येथील खाजगी हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आले आहे. या बसच्या पत्र्याने पोलीस भरतीचा सराव करणाऱ्या दोन तरुणांनाही जखमी केले.त्यात विकास गजानन पांडे (२२) याचा समावेश आहे.त्याचाही हात कापून धडावेगळा झाला आहे. विकास हा अग्निवीर भरतीची प्रॅक्टिस करत होता.ही बस मलकापूर डेपोची आहे.तिचा चालक देवराव भावराव सूर्यवंशी आहे.दरम्यान,या अपघातानंतर संतप्त जमावाने मलकापूर डेपोत तोडफोड केली.शेतकरी आणि युवक दोघांची प्रकृती गंभीर आहे.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami