मुंबई – महाराष्ट्र पोलिस दलाच्या १८ हजार ३३१ जागांसाठी ११ लाखांपेक्षा अधिक जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. पोलिस भरतीसाठी अर्ज करताना अनेक अडचणी येत असतानाही एवढ्या मोठ्या प्रमाणात या पदांसाठी उमेदवारी अर्ज आले आहेत.
महाराष्ट्र पोलिस दलातील शिपाई, वाहन चालक आणि राज्य राखीव पोलिस दलात १८,३३१ पदे भरली जाणार आहेत. त्यासाठी ऑनलाईन अर्ज मागवले होते. त्यात ११ लाखांपेक्षा अधिक जणांनी अर्ज केले आहेत. विशेष म्हणजे वेबसाईट अनेकदा कोलमडली. ऑनलाईन अर्ज करताना अडचणी येत असतानाही हे उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. ९ नोव्हेंबरपासून पोलिस भरतीसाठी ऑनलाइन अर्ज सुरू झाले होते. त्यात आतापर्यंत ११ लाखांपेक्षा अधिक अर्ज दाखल झाले आहेत.