संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Wednesday, 30 November 2022

पोटनिवडणुकीच्या मतदानासाठी अंधेरीत ३ नोव्हेंबरला सुट्टी जाहीर

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

मुंबई- अंधेरी पूर्व विधानसभा मतदार संघाच्या पोटनिवडणुकीसाठी ३ नोव्हेंबर २०२२ रोजी मतदान घेण्यात येणार आहे. त्यामुळे केंद्रीय निवडणूक आयोगाने या मतदार संघात ३ नोव्हेंबरला सार्वजनिक सुट्टी जाहीर केली आहे.

१६६ अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघात पोट निवडणूक जाहीर झाली आहे. त्यासाठी ३ नोव्हेंबरला मतदान घेतले जाणार आहे. या मतदानासाठी निवडणूक आयोगाने मतदार संघात सार्वजनिक सुट्टी जाहीर केली आहे. त्यामुळे केंद्र आणि राज्य सरकारची येथील सर्व कार्यालये, निमसरकारी कार्यालये, सार्वजनिक उपक्रम आणि बँका बंद राहणार आहेत. आपले राष्ट्रीय कर्तव्य म्हणून अंधेरी पूर्व भागातील नागरिकांनी निवडणुकीत भाग घेऊन मोठ्या प्रमाणात मतदान करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी निधी चौधरी यांनी केले आहे.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami