संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Tuesday, 27 September 2022

पैगंबर प्रकरणी सोशल मीडियावर पाकिस्तानकडून भारताची बदनामी

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

नवी दिल्ली : भाजपच्या निलंबित नेत्या नुपूर शर्मा यांनी मोहम्मद पैगंबर यांच्यावर टीका केल्यानंतर पाकिस्तानकडून भारताची बदनामी करण्यासाठी सोशल मीडियाचा वापर केला जात असल्याचा डिजिटल फॉरेन्सिक्स रिसर्च अँड अनालिटिक्स सेंटर ने याबाबत एक अहवाल सादर केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, प्रेषित मोहम्मद यांच्यावरील वादग्रस्त वक्तव्यामुळे सुरू असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर पाकिस्तान भारताविरोधात कुरापती करण्याचे सोडत नसल्याचे समोर आले असून, पाकिस्तानकडून पुन्हा एकदा सोशल मीडियाचा वापर करून भारताची बदनामी केली जात आहे. डिजिटल फॉरेन्सिक रिसर्च अँड अनालिटिक्स सेंटर ने ही माहिती दिली आहे. त्यानुसार, ६०,०००हून अधिक ट्विटर वापरकर्त्यांचे विश्लेषण करण्यात आले आहे. त्यापैकी बहुतेक नॉन-व्हेरिफाईड वापरकर्ते होते ज्यांनी भारताविरुद्ध भडकाव्याचे हॅशटॅग वापरण्याचा प्रयत्न केला. विविध देशांतील ६०,०२०वापरकर्त्यांनी या मुद्द्यावर पाकिस्तानच्या ७,१००हून अधिक हँडल्सशी संवाद साधला आहे. तसेच यामुळे पाकिस्तानातील डिजिटल माध्यमांकडून वापरकर्त्यांच्या मनात दिशाभूल करणारी अनेक फोटोज सोशल मीडियावर शेअर केली जात आहेत. तसेच या अहवालानुसार, पाकिस्तानी आर्य न्यूजसह अनेक मीडिया हाऊसने ओमानच्या ग्रॅंड मुफ्तींनी भारतीय उत्पादनांवर बहिष्कार टाकल्याची खोटी बातमी पसरवली होती. त्यांनी पैगंबर मुहम्मद यांच्यावरील वक्तव्यावर टीका केली आणि सर्व मुस्लिमांना त्याविरोधात एकत्र येण्याचे आवाहन देखील केले. त्याचप्रमाणे इंग्लिश क्रिकेटर मोईन अलीच्या नावाने एक बनावट स्क्रीनशॉट वापरण्यात आला होता ज्यामध्ये तो आयपीएलवर बहिष्कार घालण्याबाबत बोलत असल्याचे त्यामधून दिसून येत होते. इंडोनेशिया, सौदी अरेबिया, यूएई, जॉर्डन, बहरीन, मालदीव, ओमान, अफगाणिस्तान, कुवेत, कतार आणि इराणसह अनेक देशांनी शर्मा यांनी पैगंबर मोहम्मद यांच्यावर केलेल्या वक्तव्याचा तीव्र निषेध केला. इराण आणि कतारने भाजपच्या दोन्ही नेत्यांविरोधात भारत सरकारने केलेल्या कारवाईवर समाधानी असल्याचे वक्तव्य जारी केले.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami