नवी दिल्ली- केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या अध्यक्षतेखाली आज दुपारी जीएसटी कौन्सिलची 49 वी बैठक नवी दिल्लीत पार पडली. त्यात पेन्सिल शार्पनरवरील जीएसटी 18 टक्क्यांवरून 12 टक्के करण्याचा निर्णय घेण्यात आला, तर टिकाऊ कंटेनरवरील टॅग, ट्रॅकिंग उपकरणे किंवा डेटा लॉगरवरील जीएसटी 18 टक्क्यांवरून शून्यावर आणण्यात आला आहे. मात्र, यामध्ये काही अटी लागू असणार असल्याचे सीतारामन यांनी सांगितले.
उसाच्या राबावरील जीएसटी दर 18 टक्क्यांवरून पाच किंवा शून्य करण्यात आला आहे. जर ते प्री-पॅकेज केलेले किंवा लेबल केलेले असेल यावर पाच टक्के जीएसटी आकारला जाईल पान मसाला आणि गुटख्याबाबत जीओएमच्या शिफारशी मंजूर करण्यात आहे,राज्यांना 5 वर्षांसाठी देय असलेली संपूर्ण जीएसटी किंवा जीएसटी भरपाईची रक्कम जारी केली जाणार आहे. या अंतर्गत 16982 कोटी रुपये देण्यात येणार आहेत. दिल्ली, तामिळनाडू, उत्तर प्रदेश, कर्नाटकसह अनेक राज्यांच्या जीएसटी भरपाईबाबतही माहिती देण्यात आली, असे सीतारामनांनी सांगितले.