नाशिक- नाशिकच्या पेठरोड परिसरातील रस्त्यावर प्रचंड खड्डे पडले आहे. त्याविरोधात तेथील नागरिकांनी आज आक्रमक पवित्रा घेत रास्ता रोको केला आणि रस्त्यावर सरकारविरोघात आणि स्थानिक प्रशासनाविरोघात घोषणा देत आपला संताप व्यक्त केला. तेथे गोंधळ उडाल्याने पोलिसांनी नागरिकांची धरपकड सुरू केली.
रस्त्यावरील खड्ड्यांमुळे रस्त्यावर अपघात होत आहेत. तसेच रस्त्यावरील धुळ उडत असल्याने तेथील लोकांना प्रचंड त्रास होत आहे. आज रस्त्यावर उतरुन संतप्त नागरिकांनी आपला रोष व्यक्त करताना सांगितले की, ‘हा रस्त्यावर अतिशय खराब झाला आहे. तेथील खूप धुळ उडले. ही धुळ आमच्या घरात येते, त्यामुळे आम्हाला आणि आमच्या कुटुंबाला प्रचंड त्रास होत आहे. स्थानिक प्रशासनावर आम्ही रस्ता दुरुस्तीची मागणी केली होती. मात्र ही मागणी पूर्ण झाली नाही. त्यामुळे आज आम्हाला रस्त्यावर उतरावे लागले आहे.` त्यानंतर रस्त्यावर नागरिकांची आंदोलनासाठी गर्दी जमली. त्यामुळे एकच गोंधळ उडाला. मात्र परिस्थितीत नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी नागरिकांची धरपकड सुरु केली.