संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Friday, 27 January 2023

पॅरिस विमानतळावर 18 वर्षेे राहणाऱ्या इराणींचा निधन

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

पॅरिस -फ्रान्सची राजधानी पॅरिसच्या विमानतळावर तब्बल 18 वर्षे वास्तव्य करणाऱ्या इराणी व्यक्तीचा मृत्यू झाला. मेहरान करीमी नासेरी, असे या व्यक्तीचे नाव आहे. 1945 मध्ये इराणच्या खुझेस्तानमध्ये नासेरींचा जन्म झाला.

इमिग्रेशनची अचूक कागदपत्रे नसल्यामुळे यूके, नेदरलँड्स आणि जर्मनी या देशांतून हकालपट्टी झाली होती. मग त्यांनी बेल्जियममध्ये काही वर्षे घालवली. त्यानंतर तो फ्रान्सला गेले, जिथे त्यांनी 1988 मध्ये रॉईसी चार्ल्स डी गॉल विमानतळाच्या 2 टर्मिनलला आपल घर बनवले. त्यानंतर 2006 पर्यंत ते विमानतळावर राहिले. त्यांना आजारपणामुळे रुग्णालयात दाखल केले. मात्र, काही आठवड्यांपूर्वी ते मानतळावर परत आले होते आणि त्यांचा नैसर्गिक कारणांमुळे मृत्यू झाला, अस विमानतळाच्या अधिकाऱ्याने एएफपीला सांगितल.नासेरी यांच्यावर आधारित 2004 साली द टर्मिनल नावाचा सिनेमाही हॉलिवूडमध्ये प्रदर्शित झाला होता. या सिनेमात प्रसिद्ध अभिनेते टॉम हँक्स यांनी नासेरींची भूमिका साकारली होती.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Close Bitnami banner
Bitnami