मुंबई- क्रिकेटपटू पृथ्वी शॉ हल्ला प्रकरणी आज अंधेरी कोर्टात पोलिसांनी आरोपी सपना गिलला हजर केले. तिला कोर्टाने 20 फेबु्रवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. सपना गिलची भोजपुरी सिनेमा क्षेत्राशी संबंध आहे. तिने प्रसिद्ध अभिनेता रवि किशन आणि दिनेश लाल यादव यांच्यासोबत काम देखील केले आहे.
पृथ्वी शॉसोबत सेल्फी काढण्याच्या वादातून आठ जणांनी त्यांच्या गाडीवर हल्ला केला असून त्याचा पाठलाग केला. याप्रकरणी बुधवारी पोलिसांनी एका महिलेसह आठ जणांवर एफआयआर दाखल केला. उर्वरित आरोपींचा पोलीस शोध घेत आहेत.