संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Saturday, 01 October 2022

पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणी संजय राठोड यांना क्लिनचीट?

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

पुणे- पूजा चव्हाण आत्महत्याप्रकरणी माजी मंत्री संजय राठोड यांना पुणे पोलिसांनी क्लीन चिट दिली आहे. पोहरावदेवीच्या महंतांनी पोहरादेवीचे 6 महंत बाबू सिंह महाराज, कबीरदास महाराज, सुनील महाराज,जीतू महाराज, यशवंत महाराज, शेखर महाराज,आणि ऑल इंडिया बंजारा सेवा संघाचे अध्यक्ष शंकर पवार यांनी आज पुणे पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांची भेट घेत त्यांच्यावर दाखल असलेल्या गुन्ह्यांची माहिती घेतली. पुणे पोलिसांनी पूजा चव्हाण आत्महत्या आकस्मित घडलेली असल्याचे सांगितले असून तसे पत्रही या शिष्टमंडळाला दिले असल्याची माहिती समोर आली आहे.

पूजा चव्हाण ही २२ वर्षीय तरूणी बीड जिल्ह्यातील परळीत राहत होती. परळीत पूजाचे आई-वडील राहतात. पूजाला ५ बहिणी त्यापैकी ४ बहिणींची लग्न झाली आहेत. काही महिन्यापूर्वी पूजा पुण्यात इंग्लिश स्पिकिंगच्या क्लासेससाठी आली होती. वानवडीजवळील महमदवाडी येथे 7 फेब्रूवारीला पूजा चव्हाण या तरुणीने रात्री दीड वाजण्याच्या सुमारास गॅलरीतून उडी टाकली. तिच्या डोक्याला व मणक्याला गंभीर दुखापत झाली होती. मात्र दुखापत गंभीर असल्याने तिचा मृत्यू झाला होता. पूजाने महाविकास आघाडीमधील संजय राठोड याच्यमुळे मुळे आत्महत्या केल्याच्या आरोप होत होता.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami